प्रा. अनिल सोले - फॉरचून फौंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे सचिवा पासून ते सध्याच्या आमदार पदा पर्यंत चा मोठा प्रवास प्रा. अनिल सोले यांनी त्यांच्या कष्टाने व खंबीर कार्याने साध्य केले आहे. समाज कल्याणसाठी तला गाळा पासून कार्य केले असल्यामुळे त्यांचे समाजामध्ये एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. ह्या मुळे त्यांचा राजकीय प्रवास फार कमी वेळात बहरला आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाने आज जरी त्यांना उच्च पदापर्यंत पोहोचवले असले तरी गोरगरीबांची मदत आणि गरजवंतांना संधी उपलब्ध करण्यासाठी ते अजूनही कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या थोर विचारांच्या धोरणामुळे त्यांनी फॉरचून फौंडेशन संस्थेची स्थापना केली. आजची युवा पिढी ही उद्याच्या समाजाचे आधार स्तंभ आहेत, ह्या त्यांच्या ठाम विश्वासामुळे युवकांना सक्षम बनवणे हे त्यांनी आपले ध्येये बनवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरचून फौंडेशन बरेच उपक्रम राबवते ज्या मध्ये युवकांना सक्षम बनविणे व वंचित लोकांच्या उत्थानासाठी कार्य करते. एक प्रामाणिक समाज कार्यकर्ता ते एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व आता एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून आज त्यांचा लौकिक आहे. प्रा. अनिल सोले, आपल्या दूर दृष्टी आणि सकारात्मक दृष्टीकोणामुळे, युवा पिढीचे आणि समाजाचे आज आशास्थान बनले आहेत.

१९८० – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नागपूर महानगर सचिव म्हणून निवड
१९८४ – भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर शहर अध्यक्ष
१९८५ - २०११ – वी. एम . वी कॉलेज मधे गणिताचे प्राध्यापक.
१९२२- नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड
२००५ – नागपूर महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून निवड.
२००७ – नागपूर महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणून निवड
२००९– शिक्षक सहकारी बँक लिमिटेड चे अध्यक्ष म्हणून निवड.
२०१० – भारतीय जनता पार्टी, नागपूर शहर अध्यक्ष
२०१२ – नागपूर शहराचे महापौर म्हणून निवड.
२०१२ - महाराष्ट्र महापौर परिषदचे उपाध्यक्ष म्हणून निवड
२०१२ – भारत महापौर परिषदचे सरचिटणीस म्हणून निवड
२०१४ – भारत महापौर परिषदचे अध्यक्ष म्हणून निवड.
२०१४ – नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवड.

volunteer

प्रा. अनिल सोले