फॉरचून फौंडेशन - आमच्या विषयी

प्रा. अनिल सोले प्रस्थापित फॉरचून फौंडेशन ही एक ना नफा संस्था आहे. प्रा. अनिल सोले यांच्या अध्यक्षपदा खाली स्थापन केलेल्या ह्या संस्थेचा प्राथमिक उद्देश देशाला सर्वाधिक भेडसावणाऱ्या व चिंतेची बाब बनलेल्या विषयाला वेसन घालणे हे आहे. आज समाजात बेरोजगारी ही सर्वात मोठी चिंतेची बाब बनली आहे. आशेची किरण दुर्लभ झालेल्या ह्या नवीन पिढीचा बेरोजगारी अंत बघत आहे व बऱ्याच प्रमाणावर त्यांचा कल गुन्हेगारी व व्यस्नधीनता ह्या दिशेने वळताना दिसत आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टीने ही सगळ्यात मोठी काळजीची गोष्ट आहे व त्यासाठी तत्काळ पर्याय शोधून तरुणनांना सक्षम करून व त्यांना संधी शोधून देणे हे अनिवार्य झाले आहे. समाजाला लागलेल्या ह्या वाळवीला थांबविणे, हे आमच्यासाठी आज सगळ्यात मोठे कार्य आहे.

आमच्या कार्याबद्दल थोडेसे.

स्वप्न उराशी बाळगून पक्षी झेप घेऊ पाही भरारी, त्यांच्या पंखांना बळ देऊ पाही, ही संस्था आमुची. तळागाळातील वंचित असलेले तरुण युवक व गरीब गरजवंतांना मदत करणे हे आमच्या संस्थेचे उद्देश आहे. समाजात असलेल्या ह्या वंचित वर्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी फॉरचून फौंडेशन विविध उपक्रमांची योजना आखते व त्यांची अंमलबजावणी करते. नवीन दिशा, नवीन संधी व त्यासाठी लागणारे नैपुण्य किंवा कौशल्य वाढवणे हे आमचे प्रथम ध्येय आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत व आमची सालाबादप्रमाणे आयोजित केलेला युथ एम्पावरमेंट समिट हा मंच तरुणांना उंच भरारी घेण्यासाठी सक्षम बनविते आणि त्यांच्या स्वप्नांना दिशा देते.

आमची दृष्टी :

समाजात बदल घडवणाऱ्या उर्जेचे भागीदार असावे जे सगळ्यांना समान संधी देऊ पाहते व वंचित आणि पिडीत बांधवांना मदतीचा हात पुढे करते. एक चौफेर समान दृष्टीकोन ठेवून फॉरचून फौंडेशन गरजवंतांना संधी उपलब्ध करून देणे व त्यांना एक नवीन उज्वल पहाटेचे किरण दाखवू इच्छिते.

आमचे ध्येय:

गोर-गरीब व समाजातील पिडीत बांधवांसाठी मदत कार्य हाती घेणे हे फॉरचून फौंडेशनचे प्राथमिक ध्येय आहे. सकरात्मक उपक्रम राबवून, त्यातून युवकांना संधी उपलब्ध करून देणे व त्यांच्या प्रगती साठी योजना आखून, त्यांची अंमलबजावणी करणे हे आम्ही आमच्या अस्तित्वाचा उद्देश मानतो.