Slider 1

स्वप्न बाळगुणी उराशी, पंख झेप घेऊ पाहती भरारी

एकच ध्येय आमचे, या स्वप्नपूर्तीचे…

नोंदणी करा विषयपत्रिका
Slider 3

युथ एम्पावरमेंट समिट – २०१६

आजच सहभागी व्हा. तरुणांच्या उद्दमशिल स्वप्नांना दिशा देणारी एक अभिनव लोक चळवळ.

नोंदणी करा विषयपत्रिका

आमच्या संस्थेचे कार्य

आमच्या संस्थेचे ध्येय समाज कल्याणासाठी विविध उपक्रम हाती घेणे व त्यांचे सबळीकरण करणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. लोकांचे आयुष्य विकसित आणि समृद्ध करणे हे आमच्या संस्थेचे उदिष्ट आहे.

रोजगार निर्मिती

बेरोजगारी हे सध्या देशाचे सर्वात आव्हान आहे. तरुणांच्या भावी करियअर घडविण्याचे कार्य आम्ही हाती घेतो.

स्वयं रोजगार

युवा पिढीला स्वयं रोजगार निर्मिती साठी आम्ही प्रोत्साहित करतो. नौकरी करण्यापेक्षा स्वतः उद्योजक बनून दुसऱ्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यास प्रोत्साहित करतो.

कौशल्य विकास

यशाची पायरी चढण्यासाठी कौशल्याची नितांत गरज आहे. आमच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आम्ही युवकांचे करिअर सुसह्य करण्यास मदत करतो.

सामाजिक जागृती

समजातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी समाज जागृती कार्यक्रम राबवतो जेणेकरून समाज कल्याण साधता येईल.

शिक्षण

समाजात शिक्षणापासुन वंचित असलेल्या लोकांसाठी आम्ही शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो.

 

शासकीय निमशासकीय योजना

जनकल्याणासाठी शासकीय व निमशासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य आम्ही हाती घेतो.


महिला कल्याण

आम्ही महिला कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित करतो.

आरोग्य जागृती

फॉरचून फौंडेशन आरोग्य विषयी जनजागृती करण्याचे कार्यक्रम हाती घेते.

लघु उद्योग

लघु उद्योगात कार्यरत असलेल्या लोकांना सक्षम करण्यासाठी मदत करतो.

आमच्या विषयी

फॉरचून फौंडेशन ना नफा संस्थेची स्थापना गोरगरिबांची मदत, समाज कल्याण व युवा पिढीला सक्षम बनविण्यासाठी झाली आहे. संधी उपलब्ध करून देणे, समाजाचे राहणीमान उंचावणे, आणि समाज कल्याण करणे हे आमच्या संस्थेचे मूळ उधिष्ठ आहे

फॉरचून फौंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे सचिवा पासून ते सध्याच्या आमदार पदा पर्यंत चा मोठा प्रवास प्रा. अनिल सोले यांनी त्यांच्या कष्टाने व खंबीर कार्याने साध्य केले आहे. समाज कल्याणसाठी तला गाळा पासून कार्य केले असल्यामुळे त्यांचे समाजामध्ये एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. ह्या मुळे त्यांचा राजकीय प्रवास फार कमी वेळात बहरला आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाने आज जरी त्यांना उच्च पदापर्यंत पोहोचवले असले तरी गोरगरीबांची मदत आणि गरजवंतांना संधी उपलब्ध करण्यासाठी ते अजूनही कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या थोर विचारांच्या धोरणामुळे त्यांनी फॉरचून फौंडेशन संस्थेची स्थापना केली. आजची युवा पिढी ही उद्याच्या समाजाचे आधार स्तंभ आहेत, ह्या त्यांच्या ठाम विश्वासामुळे युवकांना सक्षम बनवणे हे त्यांनी आपले ध्येये बनवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरचून फौंडेशन बरेच उपक्रम राबवते ज्या मध्ये युवकांना सक्षम बनविणे व वंचित लोकांच्या उत्थानासाठी कार्य करते. एक प्रामाणिक समाज कार्यकर्ता ते एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व आता एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून आज त्यांचा लौकिक आहे. प्रा. अनिल सोले, आपल्या दूर दृष्टी आणि सकारात्मक दृष्टीकोणामुळे, युवा पिढीचे आणि समाजाचे आज आशास्थान बनले आहेत.

पुढे वाचा
volunteer

प्रा. अनिल सोले

आगामी कार्यक्रम

युथ एम्पावरमेंट समिट – २०१६ आम्ही आभारी आहोत ज्यांनी YES - २०१५ मधे सहभाग घेऊन प्रचंड यशस्वी केले. आम्ही पुन्हा युथ एम्पावरमेंट समिट – २०१६ चे आयोजन करत आहोत .
दिनांक : दि. ३० जानेवारी २०१६ , दि. ३१ जानेवारी २०१६ आणि १ फेब्रुवारी
स्थळ : मानकापूर क्रीडा संकुल, कोराडी रोड, नागपूर.

तरुणांच्या उद्दमशिल स्वप्नांना दिशा देणारी एक अभिनव लोक चळवळ म्हणजेच युथ एम्पावरमेंट समिट. आपल्या उपस्तिथिची पुष्टी करण्यासाठी येथे नोंदणी करा. तुम्हाला ह्या कार्यक्रमात भेटण्यास आम्ही उत्सुक आहोत

विश्वस्त मंडळ

Anil Sole

प्रा. अनिल सोले

अध्यक्ष
Sandeep Jadhav

श्री. संदीप जाधव

उपाध्यक्ष
Jayant Pathak

श्री. जयंत पाठक

सचिव
Abhinandan Palaspure

श्री. अभिनंदन पलासपुरे

सहकारी सचिव